भगवान महावीर सामान्य ज्ञान प्रश्न
भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याची उत्तरे आपण अचूकपणे द्यावीत त्यापूर्वी आपण भगवान महावीर यांची माहिती पाहूयात.
भगवान महावीर सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे |
भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे गुरु प्रवर्तक व तीर्थकर होते. जैन धर्मीय महावीर जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करतात. महावीर स्वामींचा जन्म बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात असलेल्या कुंण्डग्राम या गावामध्ये झाला. कुंण्डग्राम हे त्यावेळी क्षत्रियांचे प्रजासत्ताक होते. महावीरांचे वडील कुण्डग्रामचे प्रमुख राज्यकर्ते होते. भगवान महावीरांचे मन मात्र राजविलासात रमले नाही. त्यांनी जगाला अहिंसा व अपरिग्रह याची शिकवण दिली. एखाद्यास आपली गरज भासली आणि शक्य असूनही आपण मदत केली नाही तर ती एक प्रकारे हिंसाच आहे असे महावीर म्हणत असत. महावीर स्वामीजी अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच तत्वांची शिकवण जगाला दिली. त्याचप्रमाणे त्यांनी चोटी मोह द्वेष निंदा असत्य राग असंयम इत्यादी 18 पापे सांगितली. त्यांचा त्याग करावा असेच सुचवले. त्याग संयम प्रेम करुणा शील व सदाचार त्यांच्या प्रवचनाचे सार होते. देशभर फिरून त्यांनी आपल्या संदेशाचा प्रसार केला. कार्तिक कृष्ण अमावस्येला बिहारमधील पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले.
सामान्य ज्ञानावरील अधिक टेस्ट सोडवण्यासाठी - CLICK HERE |
WhatsApp Group ला जॉईन व्हावे ~ CLICK HERE
0 Comments