सम व विषम संख्या ओळखता येणे

 दिलेल्या अंकांवरून संख्या तयार करणे

सम व विषम संख्या ओळखता येणे



💥 सम संख्या - ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. 
💥 समसंख्येच्या एकक स्थानी ० ,२ , ४ , ६ , ८  यापैकी एक अंक असतो.

उदा. २० , २२ , २४ , २६

💥 विषम संख्या - ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. 
💥 ज्या संख्येच्या एकक स्थानी १ , ३ , ५ , ७ , ९  यापैकी एक अंक असतो.

उदा. ७३ , ७५ , ७७ , ७९ 

🥇क्रमवार सम संख्या दोन-दोनने बाबत जातात. 
उदा. ४२,४४, ४६.....

🥇 क्रमवार विषम संख्याही दोन-दोननेच वाढत जातात. 

🥇 दोन सम संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार सम संख्याच असते. 
उदा. १४ + १२ = २६,
      १६ - ८ = ८
      ८ × ४ = ३२

🥇दोन विषम संख्यांची बेरीज, वजाबाकी सम संख्या येते. तर गुणाकार मात्र विषम संख्या येतो
 उदा. ७ + ५ = १२, 
         २३ - १७ = ६, 
          ७ × ५ = ३५

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इयत्ता तिसरीच्या गणित विषयाच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Post a Comment

0 Comments