शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे
व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुद्धलेखन म्हणतात, अर्थपूर्ण शुद्धलेखनासाठी अनुस्वार, दीर्घ व जोडाक्षरे इत्यादीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
🥇 शुद्धलेखनाचे काही नियम
1) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो, त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा.
उदा. कांदा, सुगंध, दिंडी, संबंध इ.
2) एक अक्षरी शब्दातील 'इ' व 'उ' हा स्वर दीर्घ लिहावा.
उदा. मी, जी, ती, तू,
3) सामान्यपणे, कोणत्याही शब्दातील शेवटचा 'इ' किंवा 'उ' हा स्वर दीर्घ लिहावा
उदा. कवी, रवी, विद्यार्थी, गुरु, अणू पशु (अपवाद आणि परंतु, तथापि ) मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले, तर त्यांतील शेवटचा 'इ' किंवा 'उ' स्वर रस्व लिहावा.
उदा. कविचरित्र विद्यार्थिभाडा, गुरुकृपा, पशुधन इ.
4) अकरान्त शब्दांतील उपांत्य (शेवटून दुसरे अक्षर) 'इकार' व 'उकार' दीर्घ लिहावा
उदा. बीट, मीठ, खीर, दूध, तूप, नवनीत जमीन कबूल इत्यादी
5) शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ असेल, तर त्याच्यामागील 'इकार' व 'उकार' बहुधा हस्व लिहावा
उदा. गरिबी, गहुणा, किती, दिवा, महिना, नमुना, हुतुतु, बहिणी, वकिली इत्यादी.
![]() |
शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे |
इयत्ता तिसरीच्या घटक वाईज प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर ~ CLICK HERE
0 Comments